- उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचाही शपथग्रहण सोहळा संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही दिग्गज नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री, उद्योगपती, खेळाडू, कलाकार असे विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते महायुतीचा ऐतिहासिक विजय आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतर हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यावेळी घेतली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा भव्य सोहळा आज पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं लिहिण्यात आलं होतं.
















