न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४) :- भोसरीतील दिघी रोड येथील रंगाई रेसिडेन्सी बी विंग सोसायटीत नुकतीच ५.४ किलोवॉट क्षमतेची सोलर सिस्टीम कार्यान्वित झाली. त्यामुळे सोसायटीचे मासिक वीज बिल ८००० वरून ५०० ते १००० पर्यंत कमी होणार आहे. किमान सात हजारांची मासिक बचत होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
संस्थेचे सचिव ॲड. सचिन गोडांबे, अध्यक्ष विजय मिसाळ, खजिनदार जगन्नाथ जगताप तसेच समिती सदस्य शशिकांत माने, सुरेखा घोलप व इतर सर्व सदस्यांनी यासाठी एकत्रित येत या प्रकल्पास दोन महिन्यापूर्वी विशेष सभा घेऊन मंजुरी दिली.
संस्थेचे सचिव सचिन गोडांबे यांनी पर्यावरण रक्षण तसेच वाढते वीज बिल कमी करण्यासाठी सदस्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सरकारी MSEB यंत्रणेकडून अनेकदा परवानगी, मीटर टेस्टिंग, ऑनलाईन मंजुरीसाठी पैसे मागितले जातात, यावर कारवाई होऊन वेगाने मंजुरी मिळत गेल्यास असे प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी २ महिन्यावरून १ महिन्यावर येऊ शकतो. पुढील महिन्यात आम्ही या प्रकल्पाच्या आधारे पिंपरी चिंचवड महापालिकेकडे ग्रीन रेटिंग साठी अर्ज करणार असून किमान ३ रेटिंग मिळाल्यास सर्व सदस्यांच्या मिळकत कर बिलात सवलत मिळेल, असे सांगितले.

















2 Comments
Cyrus Casolary
Yay google is my world beater assisted me to find this outstanding web site! .
American Football Stream online
me encantei com este site. Para saber mais detalhes acesse o site e descubra mais. Todas as informações contidas são conteúdos relevantes e diferentes. Tudo que você precisa saber está está lá.