- नगर पंचायत अध्यक्षांची निवडही थेट जनतेतूनच..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
नागपूर (दि. १७ डिसेंबर २०२४):- नागपुर: राज्यातील नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा होणार आहे. पूर्वी हा कार्यकाळ अडीच वर्षांसाठी होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत कार्यकाळ वाढवून पाच वर्षे करण्याचे विधेयक सादर केले.
नगर पंचायत अध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतूनच होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कार्यकाळही पाच वर्षांचा असेल. आतापर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले जात असून दोघांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता.
थेट निवडून आलेल्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने, सभासदांनी निवडून दिलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळही पाच वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात १६ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. आता हे विधेयक मांडून राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

















2 Comments
tlovertonet
Hey! I know this is kind of off topic but I was wondering which blog platform are you using for this site? I’m getting sick and tired of WordPress because I’ve had issues with hackers and I’m looking at alternatives for another platform. I would be awesome if you could point me in the direction of a good platform.
Watch Football Online
Hey there, You’ve performed an incredible job. I’ll certainly digg it and individually recommend to my friends. I am sure they will be benefited from this site.