- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जबाबदारी झिडकारली?..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे ( दि. १७ डिसेंबर २०२४):- तळेगाव-चाकण-शिक्रापूर (एनएच ५४८-डी) च्या अस्तित्वातील दुपदरी ५४ किलोमीटर महामार्गाची सुधारणा करुन उन्नत (एलिव्हेटेड) उड्डाणपूल बांधणे तसेच हडपसर ते यवत (एनएच ६५) च्या ३२ किलोमीटर अंतरापर्यंतच्या सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे बांधकाम करण्याचे काम आता राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा (एमएसआयडीसी) मार्फत होणार असून त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून (मॉर्थ) मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या स्वनिधीतून हे दोन्ही महामार्ग विकसित केले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (मॉर्थ) बीपी आणि एसपी सेलचे कार्यकारी अभियंता नकुल प्रकाश वर्मा यांनी त्यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश कपूर यांना पत्राद्वारे कळविले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात दोन्ही महामार्गाच्या कामाची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेबाबत निर्णय घेणे आणि पुढील आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भातील प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून ‘मॉर्थ’ कडे पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावाची ‘मॉर्थ’कडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर, सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार (एनएच ५४८ डी) तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि राष्ट्रीय महामार्ग ६५ चे हडपसर-यवत या महामार्गाच्या कामाच्या प्रस्तावाची जबाबदारी ‘एमएसआयडीसी’ला सोपविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची मालकी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे असली तरी त्यांच्या विकासाची कामे आता ‘एमएसआयडीसी’ करणार आहे.
पुणे- छत्रपती संभाजीनगर ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’ संदर्भात झालेल्या सामंजस्य कराराच्या नमुन्यानुसार राज्य सरकारच्या स्वनिधीतून हे दोन्ही महामार्ग विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी राजमार्ग आणि द्रुतगती मार्गाच्या मानांकनानुसार ‘मॉर्थ’, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘एमएसआयडीसी’ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली कार्यकारी समिती स्थापन करण्याची अट ठेवण्यात आली आहे.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती देखील करण्यात आली असून पुण्यातील घोरपडी येथे लवकरच ‘एमएसआयडीसी’चे स्वतंत्र कार्यालय देखील सुरू होणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामास आता राज्य शासनाकडून गती मिळण्याच्या शक्यतेने वाहतूक कोंडीने वैतागलेल्या मावळ, खेड, शिरुर तालुक्यांतील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दोन्ही महामार्गाची मूळ मालकी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडेच राहणार असून अंमलबजावणी आणि विकास राज्य शासनाच्या स्वनिधीतून केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची मानांकने आणि विस्तृत प्रकल्प अहवालाला अनुसरुनच महामार्गाची कामे केली जाणार आहेत.
– नाझीर नाईकवाडी, कार्यकारी अभियंता, एमएसआयडीसी, पुणेराज्य सरकारने ‘मॉर्थ’कडून तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्ग विकासाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे ‘एमएसआयडीसी’कडून या महामार्गाच्या विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू व्हायला हवीत. आजपर्यंत शेकडो कोटी निधीच्या पोकळ घोषणा देण्यात आल्या. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे अनेकदा उद्घाटन झाले. परंतु, आता नित्याचे अपघात आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.
– अमित प्रभावळकर, सचिव, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समिती…

















2 Comments
Mohamed Gaunce
An impressive share, I just given this onto a colleague who was doing slightly evaluation on this. And he in actual fact purchased me breakfast as a result of I found it for him.. smile. So let me reword that: Thnx for the deal with! But yeah Thnkx for spending the time to debate this, I really feel strongly about it and love reading more on this topic. If potential, as you turn out to be experience, would you thoughts updating your weblog with extra particulars? It’s extremely useful for me. Large thumb up for this blog publish!
Live MotoGP Stream
I?¦ve recently started a blog, the information you provide on this website has helped me tremendously. Thank you for all of your time & work.