न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२४):- शेजाऱ्याच्या घरामध्ये चोरी करणाऱ्या महीलेला काळेवाडी तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. महीलेकडुन चोरीतील ६,२९,००० रुपयांचे ८.७ तोळे वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने काळेवाडी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
याप्रकरणी आकाश संतोष आचारी (वय ३० वर्षे, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला दवाखान्यात घेवुन जात असताना घराचा दरवाजा अनावधानाने उघडा राहीला. अज्ञात चोरटयाने त्याचा फायदा घेवुन घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागीने चोरुन नेले होते. काळेवाडी पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल होता. ही घटना (दि. १६) रोजी नखातेवस्ती, स्पर्श हॉस्पीटल समोर, रहाटणी येथे घडली.
शेजारी राहणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त करून तिच्याकडे कसुन चौकशी केली. तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. महीला आरोपीची झाडाझडती घेतली असता तीच्या घरातुन ६,२९,००० रुपये किंमतीचे ८.७ तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

















1 Comments
Brock Sheley
I’m not that much of a internet reader to be honest but your blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your site to come back in the future. Many thanks