- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट..
- राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२४) :- नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी आज उद्धव ठाकरे हे देखील नागपूरच्या विधीमंडळात दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची भेट का घेतली? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? तसेच विरोधी पक्षनेतेपदाबाबत ठाकरे गटाकडून काही प्रस्ताव देण्यात आला आहे का? याची माहिती त्यांनी सांगितली.
“उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळाचे गटनेते आहेत. त्या अनुषंगाने ते भेटीसाठी आले होते. ही सदिच्छा भेट होती. आता आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचा पाहुणचार नेहमी करतो. त्यामुळे त्यात वेगळं असं काही नाही”, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पदासाठी काही चर्चा केली का? किंवा त्यांनी काही प्रस्ताव दिला आहे का? असं विचारलं असता राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “माझ्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत जर कोणता प्रस्ताव आला त्यावर नक्कीच विचार करेन”, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत करताना या भेटीबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा या सरकारकडून आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वैगरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आम्ही आवाज उचलत राहू.”

















2 Comments
tlover tonet
Great post. I was checking continuously this blog and I am impressed! Extremely helpful information particularly the last part 🙂 I care for such information much. I was seeking this certain information for a long time. Thank you and best of luck.
Motorsports Live Stream
fascinate este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este conteúdo. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂