न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- मोकळ्या मैदानात चादरीमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह असल्याची खबर हिंजवडी पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वरिष्ठांना ही बाब कळवली. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चादरीत गुंडाळलेला तो मृतदेह उलगडला आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चक्रावून गेले. तो मृतदेह मनुष्याचा नसून श्वानाचा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराने उपस्थित सर्वांना दृश्यम चित्रपटाची आठवण झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदे वस्ती येथे चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची खबर हिंजवडी पोलिसांना मिळाली. हा खुनाचा प्रकार असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ही बाब वरिष्ठांना कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची पथकेही घटनास्थळी दाखल झाली.
चादरीत गुंडाळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे फोटो काढण्यात आले. थोडी दुर्गंधीही येत होती. त्यानंतर पुढील पंचनामा करण्यासाठी चादर उलगडण्यात आली. पण चादर उलगडताच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चक्रावून गेले. चादरीमध्ये मनुष्याचा नव्हे तर चक्क एका श्वानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. उपस्थित असलेल्या सर्वांनी डोक्याला हात लावला. या प्रकारामुळे अनेकांना ‘दृश्यम’ चित्रपटाचीही आठवण झाली.

















3 Comments
Gail Longest
I’ve read a few just right stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I surprise how so much attempt you put to create the sort of wonderful informative site.
Free Soccer Streaming
Your style is so unique compared to many other people. Thank you for publishing when you have the opportunity,Guess I will just make this bookmarked.2
Free Sports Streaming
Este site é realmente fabuloso. Sempre que consigo acessar eu encontro coisas boas Você também pode acessar o nosso site e saber mais detalhes! informaçõesexclusivas. Venha saber mais agora! 🙂