न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १९ डिसेंबर २०२४) :- विधान परिषदेच्या सभापती पदी भाजपचे राम शिंदे यांची आज (१९ डिसेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे. यापूर्वी देखील ना. स. फरांदे एक सर होते ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला. मला विश्वास आहे की आपणही तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं सभागृहाचा कार्यभार चालवाल यात मला शंका नाही”.

















1 Comments
tlovertonet
Magnificent beat ! I wish to apprentice while you amend your site, how could i subscribe for a blog site? The account aided me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast provided bright clear concept