न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिपाई पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे या पदाला सातवा वेतन लागू करत असताना जुनीच वेतनश्रेणी लागू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. अखेरीस राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सुधारित वेतनश्रेणी लागू केल्याने या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवर शिपाई हे एकाकी पद असल्याने मूळ पद नसल्याच्या कारणामुळे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत या पदाचे वेतन कमी झाले होते. सहाव्या आयोगात शिपाई पदाला ग्रेड पे १९००/- रुपये, नाईक पदाला २०००/- रुपये तर पुढील पदासाठी २४००/- ग्रेड पे लागू करण्यात आला होता. तर सातव्या वेतन आयोगात शिपाई पदाला १३०० ते १७०० रुये ग्रेड पे लागू करण्यात आला होता. त्याचा थेट परिणाम या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
दरम्यान, या तफावतीबाबत महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागाकडे या पदाच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्याने या कर्मचाऱ्यांना आता सुधारित ग्रड पे लागू करण्यात आला आहे.
याकरिता कर्मचारी नागेशराव जाधव, भीमा निकाळजे, अविनाश वाघेरे, रवी वाघेरे, संजय मेढेकर, मोहन फुगे, दिनकर खर्चे, सखाराम घुले, प्रसांत पाडाळे, अजय भोसले, नरेश शेडगे व अन्य कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

















1 Comments
Tressa Hosteller
Its excellent as your other content : D, thankyou for posting.