- प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार केंद्र येथे ९६ हेक्टर भूखंडावर सुमारे २००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामध्ये व्यापार केंद्र (कन्व्हेन्शन हॉल), पंचतारांकीत हॉटेल, आर्थिक दृष्ट्या परवाडणारी हॉटेल्स, परिषद सभागृह (कॉन्फरन्स हॉल) यासह व्यावसायिक भूखंड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे जवळपास एक लाख तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या विकास प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या वैभवात अलौकीक भर पडणार आहे.
पीएमआरडीएच्या मोशी येथील भूखंडावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात येत आहे. याठिकाणी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, लष्कराचे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचबरोबर पीएमआरडीए स्वतः बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांसाठी येथे दर्जेदार बांधकामांशी संबंधित प्रदर्शन भरवित असते. येथे विविध क्षेत्रातील अन्य प्रदर्शने देखील भरविण्यात आली आहेत. प्रदर्शन केंद्रातील केवळ दहा टक्के विकास प्रकल्प आजपर्यंत विकसित केली आहेत. आता उर्वरीत विकास प्रकल्प देखील विकसित करण्यात येणार आहेत. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन केंद्रातील ९६ हेक्टर जागेवर २००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांनी दिली.
त्यामध्ये ५००० प्रेक्षकांची आसन क्षमता असणारा कन्व्हेन्शन हॉल तयार करण्यात येणार आहे. ३५ हजार स्क्वेअर मीटरचे ३ सभागृह तयार करण्यात येणार आहेत. एक पंचतारांकीत हॉटेल आणि सर्वसामान्यांना परवडणारी तीन हॉटेल बांधण्यात येणार आहेत. उर्वरीत मोकळ्या भूखंडावर वाणिज्य वापरासाठी प्लॉटींग विकसित करण्यात येणार आहे. विकास कामाचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दहा वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. हा संपूर्ण प्रकल्प विकसित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडसह लगतच्या भागातील तरुणांसाठी किमान एक लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पातील सर्व विकासकामे पीपीपी तत्वावर करण्याचा मानस आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता वसईकर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील वरील विकास कामांसाठी पीएमआरडीएच्या अंदाजपत्रकात केवळ ५ कोटींची तरतूद आहे. हे प्रकल्प विकसित करण्यासाठी सुमारे २००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्वउत्पन्नावर हे शक्य नसल्यामुळे पीएमआरडीएने ३१ जानेवारी २०२४ रोजी दोन हजार कोटींच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे ठेवला होता. या प्रकल्पातील सर्व गुंतवणूक पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. अशा प्रकारचे प्रकल्प विकसित करण्याची क्षमता असणा-या संस्थांना पीएमआरडीएकडून निमंत्रित करण्यात येत आहे.
”मोशीतील अद्ययावत प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या प्रकल्पाबद्दल वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे.”
– डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए…












2 Comments
tlover tonet
Merely wanna remark on few general things, The website style is perfect, the written content is very superb : D.
Baseball Live Streams
Este site é realmente incrível. Sempre que consigo acessar eu encontro coisas diferentes Você também vai querer acessar o nosso site e descobrir mais detalhes! informaçõesexclusivas. Venha saber mais agora! 🙂