न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पीएमआरडीएच्या हद्दीत १२२ मार्गावर ५०२ बसमार्फत सेवा दिली जाते. पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. त्यामुळे बस संचलनासाठी पीएमपीला मोठा खर्च येतो. त्यामुळे पीएमआरडीएने पीएमपीला संचलनापोटी २२२ कोटी रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण ३२७ मार्गावर १६०० बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यापैकी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत १२२ मार्ग असून, त्या ठिकाणी ५०२ बस धावतात. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील अनेक मार्ग लांब पल्ल्याचे आहेत. त्यामुळे संचलनासाठी पीएमपीला मोठा खर्च येतो. त्यामुळे तत्कालिन पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ‘पीएमआरडीए’ च्या हद्दीतील मार्ग बंद केले होते. परंतु, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पीएमपी अध्यक्षांची भेट घेऊन पीएमपीएमला ‘पीएमआरडीए’कडून संचलन तुटीचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीच्या संचालक मंडळातदेखील समाविष्ठ करून घेतले. २०२३ मधील संचालन तुटीपोटी पीएमआरडीएकडून १८७ कोटी रुपये मिळाले होते.
‘पीएमपी’कडून २०२४ मध्येदेखील ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवासी सेवा दिली जात आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएमपीने ५०३ बसच्या मदतीने पीएमआरडीएच्या हद्दीत सार्वजनिक बस सेवा प्रवाशांना दिली होती. या बस चालविण्यासाठी प्रतिदिन एक कोटी २७ लाख रुपये खर्च आला आहे. त्यापैकी प्रतिदिन ६६ लाख १८ हजार रुपये तिकिटातून उत्पन्न मिळाले. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीला प्रतिदिन बस संचलनासाठी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सेवा दिल्यामुळे साधारण वर्षाचे २२२ कोटी रुपये संचालन तूट होत आहे. ही रक्कम देण्याची मागणी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे करण्यात आली आहे.












1 Comments
tlovertonet
You are my breathing in, I have few web logs and very sporadically run out from to post : (.