न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २१ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार बारणे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
थेरगाव येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, रूपेश कदम, सागर पाचार्णे यावेळी उपस्थित होते.
करण नागणे, सूरज पोइंड, चैतेश पाहिल, विक्रम कठ्ठे, आदेश खाडे, सौरभ सावंत, प्रणव वाहा, कृष्णा राठोड, अणुज घणोरकर, शिवतेज कोडेकर, तेजस राऊत, अभय राऊत, हर्षल म्हस्के, अनिकेत बोडेकर कुणाल घणोरकर, प्रथमेश रनवरे, हर्ष गिरमे, किरण गंगुरडे, समीर महानगडे, संकेत पवार, अथर्व ननवरे, हिमांक शास्वि, अभिजित घोमसे, सोमनाथ भांगे, रोहित जोशी, इमाद राजपकर, अनुराग मांटे, निरज बागवे, यश खरपोडे, शिवम चोरंगे, सागर काकडे, अमोल नाईक या युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
















