- डिसेंबरअखेरपर्यंत होणारी पाडापाडीची कारवाई थांबली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२४) :- चिखली येथील इंद्रायणीच्या पूररेषेत राजकीय वरदहस्ताने २९ बंगले आणि इतर बांधकामे केली आहेत. संबंधित घरे बांधणाऱ्यांची अतिक्रमण विभागाकडून सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्या सुनावणीचा निकाल झाला असून, हे बंगले लवकरच जमीनदोस्त करून ३१ डिसेंबरअखेर हरित लवादासह उच्च न्यायालयाला कारवाईचा अहवाल सादर करायचा होता. मात्र, त्यावर संबंधित बांधकामधारकांनी अपील केल्याने २० डिसेंबरला हरित लवादाने सुनावणी घेत या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत होणारी ही कारवाई तूर्तास थांबली आहे.
चिखली येथील सर्व्हे नंबरमध्ये बंगलो, प्लॉट बांधकाम प्रकल्प कार्यान्वित केला होता. हे प्लॉटिंग मे. जरे वर्ल्ड आणि इतरांनी केले होते. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. शिवाय आर्थिक फसवणूकही केली आहे. त्यामुळे हरित लवादाने बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.
त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या येथील रहिवाशांची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने हे क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याचा आदेश देत संबंधितांना पर्यावरण नुकसानभरपाईसाठी पाच कोटींचा दंडही ठोठावला होता. मात्र, २० डिसेंबरला सुनावणी घेत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून पुढील सुनावणी १० फेब्रुवारी २०२५ ला होणार आहे. तोपर्यंत या बंगल्यांना स्थगिती देण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.

















1 Comments
Tonda Luxton
Have you ever thought about including a little bit more than just your articles? I mean, what you say is important and all. Nevertheless just imagine if you added some great visuals or video clips to give your posts more, “pop”! Your content is excellent but with pics and video clips, this website could definitely be one of the best in its field. Good blog!