- आ. अमित गोरखे यांची विधान परिषद सभागृहात मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२४) :- शैक्षणिक योजना, नवउद्योगांच्या लाभांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. विविध शासकीय योजनांचा लाभ घेत असताना नवउद्योजक महिला, गरीब किंवा विधवा महिला आदींना हे मुद्रांक शुल्क परवडणारे आहे का? असा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात उपस्थित केला.
सर्व शासकीय आणि न्यायालयीन कामकाजासाठी प्रतिज्ञापत्रावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. त्याचप्रमाणे, मुद्रांक शुल्क आकारणीत १०० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा बोजा पडणार नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत सभागृहात उत्तर देताना सांगितले. अमित गोरखे यांनी मुद्रांक शुल्काविषयी सभागृहात माहिती मागितली होती.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मूळ गाव असलेल्या वाटेगावात अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक व्हावे, त्यासाठी राज्य सरकारमार्फत भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली. साठे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज आहे. राज्य सरकारने त्याबाबत विचार करावा, तसेच, मातंग समाजासह साहित्यिकांची असलेली मागणी म्हणजे अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणीही आमदार गोरखे यांनी केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलेल्या विरोधाचा इतिहासदेखील गोरखे यांनी मांडला.

















1 Comments
tlover tonet
wonderful publish, very informative. I’m wondering why the other specialists of this sector do not realize this. You should proceed your writing. I’m sure, you have a great readers’ base already!