न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२४) :- संत तुकाराम नगर येथे शनिवारी (दि. २१) रात्री आठ वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ७० वर्षीय वृद्ध जखमी झाला आहे.
स्फोटात खोलीच्या उताचे पत्रे उडून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. चंद्रकांत शिवलिंग कोबळे (७०, रा संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल होत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोट झालेल्या छोट्या सिलेंडरसह एक घरगुती वापराचा गॅस सिलेंडर जळालेल्या अवस्थेत जवानांनी बाहेर काढला. संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

















1 Comments
Claudie Szydlowski
I really appreciate this post. I have been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thank you again