- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२४) :- विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने चाकण, महाळुंगे, दिघी-आळंदी, देहुरोड, तळेगाव, भोसरी वाहतुक विभाग अंतर्गत येणा-या व जाणा-या परिवहन महामंडळाच्या बसेस, जड, हलकी वाहने /माल वाहतुक टेम्पो/ट्रक वाहनांकरीता (दि. ३१/१२/२०२४ ते दि. ०१/०१/२०२५) दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत वाहतुक बदल अधिसुचना जारी करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) अनुयायी यांची वाहने वगळली आहेत. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तात्पुरत्या स्वरुपात हे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी काढले आहेत.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :-
- १. चाकण ते शिक्रापुर व शिक्रापुर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणा-या व येणा-या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- २. चाकण ते शिक्रापुर व शिक्रापुर ते चाकण मार्गावर अनुयायांच्या फक्त बसेसना प्रवेश राहील. अनुयायांच्या कार, जीप इ हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही.
- ३. चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदी बाजुकडे ये-जा करण्यास सर्व प्रकारच्या खाजगी जड अवजड, मल्टी अॅक्सल वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- ४. मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व वडगाव मावळ → एचपी चौक महाळुंगे (जड वाहने/माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे बिरदवडी गाव रोहकल फाटा पुणे नाशिक रोड खेड मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील.
- ५. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी खाजगी हलकी वाहने उदा. कार जिप इत्यादी ही वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक खेड पाबळ शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील.
- ६. आळंदी / कोयाळी इ. मार्गे रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना शिक्रापुर दिशेने जाण्यास बंदी असेल. सदरची खाजगी वाहने चाकण मार्गे इच्छितस्थळी जातील.
- ७. मुंबईकडुन जुन्या मुंबई पुणे हायवेने सेंट्रल चौक देहूरोड मार्गे निगडी पिंपरी चिंचवड बाजुकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना मनाई करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहतुक सेंट्रल चौकातुन मुंबई बेंगलोर हायवेने सरळ वाकडनाका चांदणी चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
- ८. मुंबईकडुन एक्सप्रेस हायवेने पुणे बाजुकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना उर्स टोलनाका येथुन मुंबई बेंगलोर हायवेने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे निगडी पिंपरी चिंचवड बाजुकडे जाण्यास मनाई करण्यात येत असून सदर मार्गावरील वाहने वाकड नाका व राधा चौक येथुन पुणे बाजुकडे जातील.
- ९. चाकण, महाळुंगे, मरकळ, तळेगाव इ. एमआयडीसी मधील जड अवजड वाहनांना सदर कालावधीमध्ये अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई करण्यात येत आहे.
- १०. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी हलकी, जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
पर्यायी मार्ग १ :- सदर मार्गावरील वाहने अलंकापुरम चौक (तापकीर चौक) डावीकडे वळून गोडावुन चौक मार्गे इच्छीतस्थळी जातील.
पर्यायी मार्ग २ :- सदर मार्गावरील वाहने च-होलीफाटा देहुफाटा डावीकडे वळून नाशिक हायवे वरुन इच्छीतस्थळी जातील.
पर्यायी मार्ग ३ :- सदर मार्गावरील वाहने च-होली फाटा देहुफाटा चाकण चौक माजगाव एमआयडीसी चाकण मार्गे इच्छीतस्थळी जातील.
पर्यायी मार्ग ४ :- मरकळ एमआयडीसी, सोळु, धानोरे, कडुन येणारी सर्व हलकी व जड अवजड वाहणे मरकळ गाव येथून डावीकडे वळून कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकातुन चाकण येथे जावून पुढे इच्छितस्थळी जातील.
विजयस्तंभ पेरणेफाटा येथे अभिवादनासाठी जाणारे अनुयायी यांचे वाहनांकरीता मार्ग/वाहतूक बदल…
- १. नाशिककडुन येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापुर पार्किंगकडे जातील.
- २. मुंबईकडुन जुन्या मुंबई पुणे हायवेने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा म्हाळुंगे → चाकण मार्गे शिक्रापुर पार्किंगकडे जातील.
- ३. जुन्या मुंबई पुणे हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने वाहने वडगाव फाटा म्हाळुंगे चाकण चौक डावीकडे वळुन आळंदी फाटा/भारतमाता चौक/मोशी चौक आळंदी मरकळ तुळापुर मार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील.
- ४. मुंबईकडुन एक्सप्रेस हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने उर्से टोलनाका येथुन डावीकडे वळुन वडगाव फाटा म्हाळुंगे चाकण चौक आळंदी फाटा/भारतमाता चौक मोशी चौक मार्गे → आळंदी मरकळ तुळापुर मार्गे लोणीकंद पार्किंगकडे जातील.
- ५. मुंबईकडुन एक्सप्रेस हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने मुकाई चौक मार्गे सेट्रल चौक नाशिक फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.
- ६. नाशिककडून नाशिक पुणे हायवेने येणारी अनुयायांची कार, जीप इत्यादी हलकी वाहने चाकण चौकातून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारत माता चौक किंवा मोशी चौक, पांजरपोळ चौक या ठिकाणावरुन डावीकडे वळुन आळंदी मरकळ मार्गे तुळापुर वरुण पुढे लोणीकंद येथे पार्किंगच्या ठिकाणी जातील. (मरकळ गाव, इंद्रायणी नदी पुलावर ८ फुट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिकेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथुन जावु शकणार नाहीत त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल)
- ७. पुणे शहरातुन विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणावरुन आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहने येण्यास मज्जाव असेल. (सदरची वाहने वाघोली मार्गे लोणीकंदकडे पार्किंगचे दिशेने जातील.)













6 Comments
tlover tonet
You are my intake, I own few blogs and very sporadically run out from brand :). “He who controls the past commands the future. He who commands the future conquers the past.” by George Orwell.
park residential homes
I got what you mean ,saved to favorites, very decent web site.
Alanna Shivy
An interesting discussion is worth comment. I think that you should write more on this topic, it might not be a taboo subject but generally people are not enough to speak on such topics. To the next. Cheers
andar bahar
Hey, you used to write great, but the last few posts have been kinda boringK I miss your super writings. Past few posts are just a little out of track! come on!
The Analyst Agency
I know this if off topic but I’m looking into starting my own weblog and was wondering what all is required to get setup? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very web savvy so I’m not 100 certain. Any recommendations or advice would be greatly appreciated. Cheers
polos mma
Excellent blog here! Additionally your website rather a lot up very fast! What web host are you the usage of? Can I get your associate link for your host? I want my site loaded up as quickly as yours lol