न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२४) :- जेजुरीला खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा वाघापूर बेलसर मार्गावर पहाटे अडीच वाजता दोन वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकीत दोन भाविकांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाल्याचा दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघाताची खबर सागर दत्तात्रय तोत्रे, रा. कुरंगवाडी ता. आंबेगाव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, सागर तोत्रे हे आपल्या चुलत भावाचा अशोक लेलंड कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो घेऊन आपल्या नातेवाईकांसह जेजुरीला सोमवती यात्रेनिमित्त दिवदर्शनासाठी येत होते. मध्यरात्री नंतर अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळीकांचन मार्गे बेलसरहून जेजुरीकडे जात असताना जेजुरीहून उरुळीकांचनकडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली.
समोरासमोर झालेल्या धडकेत छोटा हत्ती चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे (वय ३५ रा. कुरवंडी ता. आंबेगाव) आणि भाविक महिला आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५० रा. जरेवाडी ता. खेड) हे दोघे जण मृत्युमुखी पडले. तर मंगल तोत्रे, ज्ञानेश्वर तोत्रे, राहुल तोत्रे, अनुष्का तोत्रे, तानाजी तोत्रे, विलास तोत्रे, बाळू तोत्रे, अश्विनी तोत्रे, मीरा करंडे, ओंकार करंडे, बाबाजी करंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यरात्रीनंतर झालेल्या अपघाताची बेलसर हद्दीतील स्थानिकांनी जेजुरी पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीना उपचारासाठी जेजुरीतील खासगी दवाखान्यात आणले. त्याच बरोबर टेम्पो चालक शांताराम भिकोबा पवार (वय ५०) रा. वडाची वाडी वाल्हे ता. पुरंदर यांस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.













2 Comments
tlover tonet
Great paintings! That is the type of info that are supposed to be shared around the internet. Disgrace on Google for no longer positioning this post higher! Come on over and visit my site . Thanks =)
Live MotoGP streaming free
good post.Never knew this, thankyou for letting me know.