न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिकांनी पर्यटन स्थळांवर गर्दी केली आहे. लोणावळ्यामध्येही यानिमित्ताने पर्यटकांची गर्दी झाली आहे. मात्र, काही अप्रिय घटना घडू नये यासाठी लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळे मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी चार वाजता बंद करण्यात येणार आहेत.
नवीन वर्षाच्या आगमनासाठी अनेक पर्यटक पर्यटनस्थळी भेट देत असतात. या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र, वन विभागाकडे बंदोबस्तासाठी मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे मंगळवारी लोणावळ्यातील काही पर्यटनस्थळे लवकर बंद करण्यात येणार आहेत. त्यामध्ये टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट यांचा समावेश आहे.
त्यामुळे पर्यटकांनी मंगळवारी सायंकाळी चारनंतर पर्यटन स्थळांवर गर्दी करू नये, असे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. दरवर्षी ही पर्यटनस्थळे दिवसभर बंद करण्यात येतात. परंतु यंदा चारपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. पर्यटनस्थळी गर्दी होऊ नये, म्हणून वनविभागाकडून निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.













1 Comments
tlovertonet
WONDERFUL Post.thanks for share..more wait .. …