न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२४) :- यांत्रिकी पद्धतीने साफसफाई केली जात असलेल्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतील रस्त्यांची पाहणी करण्यात येत असून, त्याचा फेरआढावा घेऊन त्यामध्ये योग्य ते बदल केले जात आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज केले जाते. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पद्धतीने चार भागांमध्ये काम सुरू असून, यासाठी चार एजन्सी कार्यरत आहेत. प्रत्येक पॅकेजमध्ये २ हेवी रोडस्वीपर, २ मीडियम रोडस्वीपर, ४ गॉब्लर लिटर पिकर, २ हूक लोडर, १ पाण्याचा टँकर आदी वाहनांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील १८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंद असलेल्या रस्त्यांवर यांत्रिकी पद्धतीने साफसफाई केली जात आहे; मात्र काही रस्ते, फुटपाथवर महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे साफसफाई करताना अडचणी येत आहेत. याचाच विचार करून आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्त्यांचा फेरआढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत चार क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्त्यांचा आढावा पूर्ण झाला असून, रस्ते साफसफाईसाठी काही बदल करण्यात आले आहेत.
– अजिंक्य येळे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका…













3 Comments
Danna Mckale
I gotta favorite this site it seems handy very helpful
Free Basketball Streaming
whoah this blog is great i love reading your articles. Keep up the good work! You know, a lot of people are searching around for this information, you can aid them greatly.
MotoGP Live Stream Online
Este site é realmente fantástico. Sempre que consigo acessar eu encontro coisas diferentes Você também vai querer acessar o nosso site e descobrir mais detalhes! conteúdo único. Venha descobrir mais agora! 🙂