- वैद्य व्हिसाशिवाय बनावट आधार आणि पॅन कार्डच्या मदतीने वास्तव्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- घुसखोरी करून भारतात आलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी)ने ताब्यात घेतले आहे. हुसेन शेख, मोनीरुल गाझी, अमीरूल साना आणि आणखी एक अनोळखी इसम (मूळ रा. बांगलादेश, सध्या नवलाख उंब्रे, ता मावळ) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
भारतात राहण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही वैद्य व्हिसा नव्हता. तसेच त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरील मुलगी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी सुद्धा घेतली नव्हती. बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवून घेऊन ते भारतीय नागरिक असल्याचे भासवत होते.
याप्रकरणी दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसी) यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार (दि. ३०) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवलाख उंब्रे, ता मावळ येथे पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी रोशन पगारे पोलीस शिपाई एटीसी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी चौघांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.













1 Comments
tlover tonet
I genuinely enjoy looking at on this website , it contains fantastic content.