- शहरवासियांसाठी कौतुकाची बाब – मा. नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- ओम साई क्रिकेट अकॅडमीची खेळाडू भाविका अहिरे हिने यशाला गवसणी घालत पिंपरी चिंचवड शहराचे नाव महिला क्रिकेटमध्ये मोठे केले आहे. भाविका हिची १९ वर्षाखालील टी २० महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच कासारवाडी येथे संपन्न झाला.
भाविका वयाच्या १० व्या वर्षांपासून ओम साई क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक संजय हाडके यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. भाविका फलदांज आणि विकेट-किपर म्हणून संघात खेळते. भाविकाने पंधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून खेळताना संघाचे कर्णधार पद भूषविले आहे. तिने प्रदार्पणच्या सामन्यात मुंबई विरुद्ध खेळताना तिने १२९ धावांची शतकी खेळी केली होती आणि फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले होते. त्याच्या पुढील वर्षी एकोणीस वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून प्रदार्पणच्या सामन्यात मेघालय विरुद्ध खेळताना तिने ११९ धावांची शतकी खेळी केली होती. खेळातील सातत्यामुळे भाविकाची तीन वेळा नॅशनल क्रिकेट अकॅडेमि बंगलोर येथे उच्च क्रिकेट प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आणि त्यातूनच पहिल्या १९ वर्षाखालील महिलांच्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भारताने आशिया कप स्पर्धेचे अजिक्यपद पटकावले. आता जानेवारी महिन्यात होणारी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुद्धा भाविका खेळणार आहे. समस्त पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
भाविका भोसरी प्राधिकरण सेक्टर-१० मध्ये राहत असून तिने आपले प्राथमिक शिक्षण श्री रविशंकर विद्यालय आणि माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल इंद्रायणीनगर येथे पूर्ण केले. ती सध्या एस पी कॉलेज पुणे येथून वाणिज्य शाखेत आपले शिक्षण घेत आहे.
गुणगौरव कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा. नगरसेविका आशाताई शेंडगे, उद्योजक प्रताप मोहिते, माजी रणजी खेळाडू प्रदीप इंगळे, युवराज कदम, महिला भारतीय क्रिकेपटू सोनिया डबीर, मनीषा कोल्हटकर, ज्युडिशियल क्रिकेट क्लबचे संचालक दीपक शिंदे, पिंपरी चिंचवड मधील नामवंत क्रिकेटपट्टू आणि वरिष्ठ प्रशिक्षक राजू कोतवाल आदी उपस्थित होते.
या अकॅडमीतून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू श्रावणी देसाई, रोहित हाडके, हर्षल हाडके यांचाही गुणगौरव सोहळा संपन्न झाला .या क्रीडांगणासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर, राजेश पाटील व आयुक्त शेखर सिह यांचे सहकार्य मिळाले. तत्कालीन क्रीडा अधिकारी संदीप खोत, विठ्ठल जोशी, मिनीनाथ दंडवते, साळवे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अकॅडमीतून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू श्रावणी देसाई, रोहित हाडके, हर्षल हाडके यांचाही गुणगौरव सोहळा संपन्न झाला.













1 Comments
tlover tonet
Hey there just wanted to give you a quick heads up and let you know a few of the pictures aren’t loading properly. I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different web browsers and both show the same results.