न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- भावभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण, वाढदिवसानिमित्त सत्कार आणि नववर्षातील संकल्पाची आखणी करत पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनच्या सदस्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला.
कुणाल आयकॉन रोडवरील बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणावर सोमवार दि. ३० रोजी सायंकाळी असोसिएशनच्या वतीने वर्षाअखेरचा कार्यक्रमाचा आयोजित करण्यात आला होता. गुरुवंदनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि वर्षभरात असोसिएशनच्या दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
डॉ. सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सखाराम ढाकणे, सुभाष पाटील, अनिल कुलकर्णी, निर्मला कासार, शोभा राजगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षा अखेरचे औचित्य साधून असोसिएशनचे सदस्य अशोक येळंमकर, पद्मजा गवळी, माधुरी मुलमुले, डी. बी. कडते, अरविंद मनवेलीकर, घनश्याम आणि भगवती स्वामी यांनी यावेळी वैविध्यपूर्ण गाणी सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. दोन ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन शकुंतला शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश पिंगळे, विवेकानंद लिगाडे, सुभाष विधाते, रमेश वाणी, विजय रोकडे, अशोक येळंमकर, जयपाल सिदनाळे आदींनी परिश्रम घेतले.













1 Comments
tlover tonet
I have been surfing online greater than three hours nowadays, yet I by no means found any attention-grabbing article like yours. It is lovely worth enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made just right content material as you probably did, the net might be much more useful than ever before.