न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२५) :- आरएमसी काँक्रीट पंप मशीनमध्ये अडकलेल्या तरुणाची पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानाने सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन चौकाजवळ घडली. भागवत घुगे (वय २५) असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक जण मशीनमध्ये अडकला असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. रहाटणी आणि अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. आरएमसी काँक्रीट पंप मशीनमध्ये एका तरुणाचा पाय अडकल्याचे दिसून आले. रॉड कटिंग ग्रॅडर, बोल्ट कटर सेपरेटर या मशीनच्या मदतीने अडकलेल्या तरुणाची अवघ्या १५ मिनिटांमध्ये सुटका करण्यात आली.
लिंडींग फायरमन सारंग मंगरूळकर, यंत्रचालक रुपेश जाधव, काशिनाथ ठाकरे, सरोज फुंडे, भूषण येवले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. मदतीसाठी कॉल आल्यानंतर अग्नीशामक विभागाकडून मदत केली जात आहे. यामुळे नागरिकांमधून समाधन व्यक्त होत आहे.













