- दुकानातील किराणा भोवला; डंपर चालक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२५) :- किराणामाल खरेदी करून एक्काहत्तर वर्षीय आजी या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. रस्ता क्रॉस करण्यासाठी त्या डिव्हायडर जवळ थांबल्या होत्या. तेवढ्यात भरधाव वेगाने डंपर तिथे आला. डंपर चालकाने हयगयीने डंपर चालवून आजींना जोरात धडक दिली.
त्या धडकेत त्या खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. या घटनेत एक्काहत्तर वर्षीय विठाबाई साळुंखे या आजींचा मृत्यू झालेला आहे. या अपघातास आरोपी डंपरचालक कारणीभूत ठरला आहे.
हा प्रकार शनिवार (दि. ११) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आळंदी-पुणे मुख्य रोड लगत काळेवाडी झोपडपट्टी येथील सार्वजनिक रस्त्यावर आळंदी घडला आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय अविनाश सगट यांनी आरोपी डंपर चालक राधेश्याम पाईकराव (रा. नाशिक) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.
















