- लाखाचा कर थकविल्याप्रकरणी पालिकेने धाडली नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 15 जानेवारी 2025) :- बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे.
वाकडमधील पार्क स्टेट येथे कोट्यावधीचा फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे.
कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
















