- बेशिस्त वाहन चालकांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला..
- अपघाताचा धोकाही वाढला धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२५) :- भोसरी परिसरातील इंद्रायणीनगर येथील इंद्रायणी चौकात नेहमीच चक्काजाम होत आहे. चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे परिसरात मोठी कोंडी पडत आहे. भोसरी एमआयडीसीकडे जाणारी वाहने येथुनच जातात.
दरम्यान येथील सिग्नल देखील बंद अवस्थेत आहेत. बेशिस्त वाहन चालक कशाही पद्धतीने आपले वाहने चालवतात. भोसरीतील मुख्य रस्त्यावरून येणारी वाहतूक काही एमआयडीसीकडे तर काही गुळवे वस्तीकडे आणि इंद्रायणीनगरकडे जाते. त्यामुळे एकच चौकातून विविध ठिकाणी जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहनांची मोठी रांग लागत आहे.
या परिसरात वाहतूक पोलीस आणि बंद सिग्नलअभावी बेशिस्त वाहन चालक कशीही वाहने चालवतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात सर्सास घडत आहेत. याशिवाय शेजारीच लोकवस्तीचा भाग असल्यामुळे येथे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेजारीच शाळा असल्यामुळे पालकांसह मुलांची देखील सारखीच ये-जा सुरू असते. त्यामुळे त्यांना जीव मोठे घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे.
वर्दुळीचा परिसर असल्यामुळे या चौकातील बंद अवस्थेतील सिग्नल त्वरित चालू करावेत. वाहतूक पोलिसाची या ठिकाणी नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
या चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. येथील सिग्नल कधी चालु तर कधी बंद असतात. त्यामुळे ते चालु करावेत.
– सोनवणे (जेष्ठ नागरिक)…संबंधित ठिकाणची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केली जाईल. वाहतुक सिग्नल पुर्वरत केला जाईल.
मा. बापू बांगर (उपायुक्त, वाहतूक पोलीस विभाग)….
















