न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२५) :- चिखली येथील सोनवणे वस्तीत एकाच कुटुंबातील तीन जणांनी छताच्या पंख्याला गळफास घेत सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर पती जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२०१६ ते १८ जानवोरी २०२५ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी महिलेसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शुभांगी वैभव हांडे (वय ३६) आणि धनराज वैभव हांडे (९) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
शुभांगी यांचे पती वैभव मधुकर हांडे (४५, सर्व रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष कदम, संशयित महिला (दोघेही रा. ताथवडे), संतोष पवार (रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद खान (रा. मोई, ता. खेड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















