न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२५) :- औद्योगिक शिक्षण मंडळातर्फे व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञानावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन अजिंक्य डी. वाय. पाटीलचे उपकुलपती डॉ. एकनाथ खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी डॉ. एकनाथ खेडकर यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. ‘व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञानातील भविष्यातील बदल ओळखून संशोधकांनी संशोधन करावे जेणेकरून आपल्या संशोधनाची जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल,’ असे मत डॉ. एकनाथ खेडकर यांनी मांडले.
अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे प्रास्ताविक यांनी केले. विपणन व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, मानवी संसाधन व्यवस्थापन, शेती व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान आणि डेटाविज्ञान, सामान्य व्यवस्थापन आदी विषयावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राध्यापक व विद्यार्थी यांचे संशोधन पेपरचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
संस्थेच्या सचिव डॉ. आशा पाचपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या परिषदेचे समन्वयक डॉ. हंसराज थोरात यांनी संशोधन अहवाल सादर केला. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे, डॉ. डॅनियल पेणकर आणि डॉ. त्र्यंबक हिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संशोधकाच्या संशोधन पेपरचे आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पुस्तकाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. मधुरा शुक्ला, डॉ. दिक्षा त्रिपाठी व डॉ. रीता काकडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. त्र्यंबक हिवरकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संथेच्या संचालिका डॉ. प्रीती पाचपांडे, डॉ. वृषसेन पवार, टास्क फोर्स कार्यकारी संचालक डॉ. दत्तात्रय बाळसराफ, डॉ. संदीप साने, प्राचार्य डॉ. ललितकुमार कनोरे, डॉ. विकास बरबटे उपस्थित होते.











