न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- थेरगाव येथील आई-वडिलांच्या घरात मुलगा व सून रात्री जबरदस्तीने घुसले. वडील विलास अवघडे यांच्याकडे पुनावळे आणि कोल्हापूर येथील संपत्ती विकण्याची मागणी केली. नकार दिला असता मुलगा आणि सूनेने त्यांना बेदम मारहाण केली.
ही घटना थेरगाव येथे सोमवार (दि. १३) रोजी रात्री दहा वाजता घडली. आरोपी प्रसाद आणि प्रियंका आई वडिलांपासून विभक्त राहतात. प्रसाद विलास अवघडे आणि प्रियांका प्रसाद अवघडे अशी आई वडिलांना हाणामारी करणाऱ्या मुलाचे व सुनेचे नाव आहे. याप्रकरणी मुलाची आई मीना विलास अवघडे (रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिस पुढील तपास करीत आहेत.











