न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी डीलक्स चौक येथील डीलक्स मॉलमधील दुकानांमध्ये ॲपल कंपनीचे नाव व नकली लोगो असलेले मोबाईल बँटरी, स्क्रीन गार्ड, बँक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन असे साहित्य विक्रीस होते. ते साहित्य मूळ कंपनीचे असल्याचे भासवून विक्री केली जात होती.
याबाबतची माहिती पिंपरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. ही घटना बुधवारी (दि. १५) रोजी दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील डीलक्स चौक येथे घडली. वसनाबाई मनकाजी रब्बारी (साईचौक, रा. गुजरात), मोहबताराम पिराजी चौधरी (पिंपरीगाव), गणेश भगवानरामजी चौधरी (पिपरी), जामताराम जेठाराम चौधरी (साईचौक, मूळ रा. राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .
चौघांकडून एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा विक्रीसाठी ठेवलेला बनावट माल पोलिसांनी जप्त केला. चौघावर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











