- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू होते उपचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 31 जानेवारी 2025) :- महापालिकेच्या रुग्णालयात मज्जातंतू विकार GBS ने ग्रस्त असलेल्या एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ मज्जातंतूच्या आणि इतर विकारांसह हा रूग्ण ग्रस्त होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. राज्यात संशयित GBS मृत्यूची संख्या तीन झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
कॅब सेवेत चालक म्हणून काम करणाऱ्या या रुग्णाला २१ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCMH) मध्ये दाखल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
“YCMH मधील एका तज्ज्ञ समितीने तपासणी केली आणि असा निष्कर्ष काढला की मृत्यूचे कारण न्यूमोनियामुळे श्वसनसंस्थेला झालेला आघात होता, ज्यामुळे श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता,” असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रूग्णालयात भर्ती होण्याआधीच मयत रुग्णाची प्रकृति गंभीर होती. तपासणीअंती मयत रूग्णाला न्यूमोनिया आणि जीबीएस आजार झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र क्षणोक्षणी त्याची प्रकृति क्षीण होत गेली. सध्या एकुण संशयितांपैकी एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बाकी रूग्णांची प्रकृति स्थिर आहे. या आजारासाठी महापालिकेच्या सर्वच रूग्णालयात खाटा राखीव आहेत. – लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा….












2 Comments
Lovetta Tevlin
Hiya very cool site!! Man .. Beautiful .. Wonderful .. I’ll bookmark your web site and take the feeds additionally…I am satisfied to find a lot of helpful information right here in the post, we need work out more strategies on this regard, thanks for sharing. . . . . .
Basketball Live Stream Free
I will right away take hold of your rss feed as I can not to find your e-mail subscription hyperlink or e-newsletter service. Do you’ve any? Please let me realize in order that I could subscribe. Thanks.