- हे करा आणि या आजारापासून रहा दूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- GBS आजार हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे जिथे शरीराची रोग प्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो.
दरम्यान आजपर्यत पिंपरी चिंचवड शहरात एकुण १९ रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ८ रुग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. यापैकी १ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. मंगळवारी नवीन संशयित GBS रुग्णाची नोंद झाली नाही.
• आजाराची सर्वसाधारण लक्षणे –
अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील ञास किवा कमजोरी.
डायरिया (जास्त दिवसांचा)
• आतापर्यंत केलेल्या उपाययोजना
गृह सर्वेक्षनाकरीता एकूण १६ पथके नेमण्यात आलेली आहेत
प्रत्येक टीम मध्ये एक एमपीडब्लू, एक एएनएम व एक आशा कार्यकर्ती आहे
दररोज मनपाच्या सोशल मिडियाद्वारे शिजवलेले अन्न खावे, पाणी उकळून प्यावे व इतर काळजी घ्यावी याकरिता माहिती देण्यात येत आहे
सारथी प्रकल्पाच्या मदतीने हेल्पलाईन आज कार्यान्वित करण्यात आली आहे- ७७५८९३३०१७ व याकामी ७ वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक रुग्णालय झोननिहाय एक वैद्यकीय अधिकारी अशा एकूण ८ वैद्यकीय अधिकारी यांची GBS नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
दिनांक २७.०१.२०२५ रोजी GBS चे रुग्ण दाखल असलेल्या ५० खाजगी रुग्णालयांची गुगल मीट घेण्यात आली
दि. २९.०१.२०२५ रोजी मनपाच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे या बाबत वेबिणार घेण्यात आले. सदर वेबिणार मध्ये ८०२ डॉक्टरांनी सहभाग घेतला.
मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक प्रमाणात लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध आहे
घरोघरी सर्व्हेक्षण अंतर्गत आजपर्यंत १८२५५ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
वयानुसार रुग्णांचा तपशिल…
| वयोगट | एकूण |
| 0-9 | ३ |
| 10-19 | १ |
| 20-29 | २ |
| 30-39 | ३ |
| 40-49 | २ |
| 50-59 | ४ |
| 60-69 | ३ |
| 70-79 | १ |
| १९ |
यापूर्वी तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी १० पाणी नमुने पिण्यास अयोग्य असा अहवाल राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. तथापि सदरचे पाणी नमुने घरातील साठवून ठेवलेल्या भांडयामधून घेतलेले पाण्याचे नमुने आहेत. मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचे एकूण २५३७ पिण्याचे पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये सर्व नमुने पिण्यास योग्य आढळून आलेले आहेत.
• मनपा नळाद्वारे पुरवठा होणारे पिण्याचे पाणी पिण्यास योग्य आहे.
• साठविलेल्या पाण्याचे भांडे स्वच्छ असणे गरजेचे आहे.
• साठवलेल्या पाण्याचे भांडी झाकून ठेवणे आवश्यक आहे.
• पिण्याचे पाणी योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे.
• पाणी उकळून गार करून पिण्यात यावे.
• उघड्यावरचे अन्न खाऊ नये.
• अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
• वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
• शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (chicken, mutton) खावू नये.
तसेच नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत मनपाच्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व नागरिकांनी वरील प्रमाणे या आजाराच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्यावी, अस आवाहन डॉ. लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.
—
















