न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२५) :- वाकड परिसरात बीएमडब्लु (BMW) या आलिशान भरधाव वेगात जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यातील कार चालक सयाजी हॉटेल जवळून पुणे शहराकडे जाणाऱ्या सर्विस रोडने जात असताना हा अपघात झाला आहे.
वाकड परिसरात कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र कारचालकाने वेळीच आपली कार भर रस्त्यात थांबवून, कारमधून बाहेर पडल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे.
कारला आग लागल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहर अग्निशमन दलाला मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहचून कारला लागलेली आग आटोक्यात आणली आहे. मात्र रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या BMW कारणे नेमकं कशामुळे पेट घेतला? हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
















