देहुगावावर शोककळा; पोलीसांनी वर्तवला हा अंदाज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 05 फेब्रुवारी 2025) :- संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज (वय ३१) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आर्थिक बाबतीतुन हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली असून, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष मोरे महाराज हे मंगळवारी रात्री आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेल्यानंतर सकाळी साडेआठपर्यंत बाहेर आले नव्हते. घरातील सदस्यांनी त्यांना आवाज दिला, दरवाजा वाजवला, पण प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
प्राथमिक तपासात, शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सदर चिठ्ठी ताब्यात घेतली असून, त्याचा तपास सुरू आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की, “आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अधिक चौकशी करून खरी कारणे समोर आणली जातील.”

















1 Comments
Thurman Jacot
Would you be interested in exchanging links?