न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी२०२५) :- मुलीच्या मुलाखतीसाठी पिंपरी चिंचवडकडे दुचाकीवरून फिर्यादी जात होते.
यावेळी नाशिक पुणे महामार्गावर मालवाहू ट्रकने फिर्यादीच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्या धडकेत दुचाकीवरून ते दोघेही खाली पडले. अपघातामध्ये फिर्यादीस पायाला गंभीर दुखापत झाली.
तर, फिर्यादीच्या 19 वर्षीय मुलीच्या डोक्याला मार लागून त्यातच ती मयत झाली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोशीतील भारत माता चौक येथे घडला आहे.
याप्रकरणी फिर्यादी रशीद पठाण यांनी आरोपी ट्रकचालक रामदास साळुंखे यांच्या विरोधात फिर्याद नोंदवलेली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
















