न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२५) :- तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच तो विनयभंगाच्या गुन्ह्यातही फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत असल्याने तो स्वतः पोलिस चौकीत हजर झाला.
‘मला का शोधत आहात’, अशी विचारणा करीत त्याने साफसफाईसाठी वापरण्यात येणारे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथील मोहननगर चौकीत गुरुवारी (दि. ६) रात्री अकराच्या सुमारास घडली.
रुपेश राम बहिरवाडे (२५, रा. चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार दत्तात्रय भागुजी निकम (वय ४३) यांनी शुक्रवारी (दि. ७) याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.