न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२५) :- शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचालित कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विरोधी पक्ष नेते विठ्ठल नाना काटे, केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष संदीप पारख, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष रवि पवार, विशाल शेवाळे, मा. नगरसेवक कैलास थोपटे, शिक्षण मंडळ प्रकल्प अधिकारी विलास पाटील, उमेश शिंदे, सोनाली फाले, नामदेव गायकवाड, प्रशांत भोसले, जालिंदर पवार, चंद्रकांत तापकीर, सोमनाथ तापकीर संतोष पानसरे, सायली तापकीर, मोनाली धापटे प्रकाश लोहार, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य, नाटिका, गीतगायन आणि अन्य कलात्मक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांना पालक आणि शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रसंगी विवेक तापकीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा आणि सांस्कृतिक घडामोडींचे महत्त्व सांगितले. तसेच, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे आधारस्तंभ सचिव मल्हारीशेठ तापकीर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विवेक तापकीर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.











