न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२५) :- मोहनगर येथील श्री विश्वकर्मा जॉगिंड समाज संस्थेचा नुकताच २३ वा श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव मोहननगर चिंचवड येथे साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जॉगिड ब्राह्मण समाजपरिवार कार्यक्रमास उपस्थित होता.
या महोत्सवात भजन कलाकार शुभम एवं उगमराज बिखरणिया आणि पार्टी यांचा संध्या भजन कार्यक्रम,सत्संग,होमहवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भजन कार्यक्रम संचालन विशाल रामावत यांनी केले.
कार्यक्रमासाठी देणगीस्वरूपात सहभागी असणारे रायचंड गोठडीवाल.पुखराज माकड, प्रेमसुख झाला, हडमान भदरेचा, ताराचंद खोखा,रामनिवास पांखरोड, सुरजभान पालडीया, मुकेश दंदेवा, नथमल ओस्तवाल, ओमप्रकाश भदरेचा, राजेंद्र पालडीया, मुकेश बोदलीया, खेताराम हंसवाल, रामकिशोर बांदल, किशोर रुलेटिया, इंद्र चंवेल, राजेंद्रकुमार हंसवाल, मुगनाराम डेरोलिया यांना संस्थच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक तसेच विविध क्षेत्रात २७ वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहर तसेच राज्यभरात कार्यरत असणारे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांचा विशेष अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रायचंद गोठडीवाल, उपाध्यक्ष रमेश पंवार, सचिव राजेंद्रप्रसाद दंदेवा, राकेश हंसवाल, दिनेश बांमणिया, रामेश्वर सिलग, बजरंगलाल बामणिया, रामकुंवर माकड प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी विशेष श्रम कैलास उरबाणीया, रामप्रसाद आसलीया, रामरतन धाराणिया, राजुराम सिलग, राजुराम दंदेवा, इंद्र चंदेल, रामनिवास आडोटिया, मोतीराम लदोया, जगदीश अठवासी, राजेंद्र दंदेवा, ओमप्रकाश भदरेचा, पुजारी मुकुट शर्मा यांनी केले. या कार्यक्रम महोत्सवास परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते.











