न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०, रा. अक्षरा इलेमेटा सोसायटी, ताथवडे) असे तिचे नाव आहे.
ती आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय ५४) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय २०, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपविल्याचे समोर आले आहे.












1 Comments
📟 Reminder; Transaction NoGI65. NEXT => https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=edb629b4b84c3c49c0b19f8e662a2bea& 📟
r91jh2