- चिखली कारवाई आणि सील मालमत्ताधारकांमुळे मेटाकुटीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाला या आर्थिक वर्षात एक हजार कोटींचे लक्ष्य गाठायचे आहे. आतापर्यंत ७६० कोटींचा भरणा पालिकेच्या तिजोरीत करण्यात आला असून, येत्या दीड महिन्यांत २४० कोटी वसुलीवर विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुदळवाडीतील अतिक्रमणविरोधी कारवाई, तडजोड रकम भरण्याची तयारी दर्शवून देखील घेतलेली कठोर भूमिका अशी अनेक कारणे करसंकलन विभागाला आपले लक्ष्य गाठण्यापासून अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे आगामी सव्वा महिन्यात करसंकलनासाठी झगडावे लागणार असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या वतीने कुदळवाडीतील हजारो अनधिकृत दुकाने, घरे व उद्योगांवर कारवाई केली आहे. अजुनही काही दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. या भागातून करसंकलन विभागाला मिळणारे उत्पन्न आता मिळणार नसल्याचे वास्तव आहे. या भागातून मिळणाऱ्या सुमारे ५० कोटी अथवा त्यापेक्षा अधिक उत्पत्रावरकर संकलनला पाणी सोडावे लागणार आहे. याचा मोठा फटका वसुलीला बसणार आहे.
आतापर्यंत एकूण ७५७ मिळकती जप्त केल्या आहेत. त्यापैकी ४३८ जणांच्या मिळकती लिलावात काढल्या. त्यातील ३१९ जणांकडून ४८ लाखांची वसुली झाली आहे. एप्रिलनंतर मिळकत कर वसुली आणखी शिस्तबद्ध होण्यासाठी प्रक्रिया राबविणार आहे.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त – कर संकलन विभाग, मनपा…














