- चक्क जनसंवाद सभेत अधिकाऱ्यांना गाजराचा हार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- जनसंवाद सभेत गाजराचा आणि पैशांचा हार स्वतःच्या गळ्यात परिधान करून दापोडी, फुगेवाडी येथील शिवसेनेचे निलेश हाके ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित झाले होते.
गेली आठ महिने सातत्याने विद्युत विभागाची तक्रार करूनही कामे होत नसल्याने गाजराचा हार विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आहे, नोटिसा देऊन ज्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत, आणि जे देत नाहीत त्यांच्यावर अतिक्रमण विभाग हातोडा घालतो त्या अधिकाऱ्यांना पैशाचा हार घालणार आहे. तसेच तक्रारीची योग्य ती दखल घेतल्याने आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी आणि निरीक्षक यांना गुलाब पुष्प हार अर्पण करणार असल्याचे, निलेश हाके यांनी सांगितले.
दरम्यान अनोख्या आंदोलनानंतर शेवटी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जाईल, असे सांगितल्याने हाके सभागृहाबाहेर परतले.










