न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- नेहरूनगरमधील अनधिकृत ४२ टपरीधारकांना ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने नोटीस बजावली आहे. येत्या पंधरा दिवसांत टपऱ्या पाडाव्यात, अन्यथा महापालिकेकडून कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद आहे. त्यामुळे टपरीचालक धास्तावले आहेत.
येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा ४२ टपऱ्या आहेत. हे टपरीचालक गेल्या दहा ते बारा वर्षांपासून येथे व्यवसाय करतात. त्यामध्ये झेरॉक्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वेल्डिंग शॉप, गॅरेज, फॅब्रिकेशन, स्लायडिंग विंडो, फोटो फ्रेम तयार करणारे व अन्य छोटे व्यावसायिक आहेत, परंतु आता या व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
नेहरूनगर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड यांच्यावर आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात संबंधित व्यापाऱ्यांना पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आलेली आहे.
अजिंक्य येळे, सहाय्यक आयुक्त, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय…










