न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी मोशी येथे एका अनोळखी महिलेचा खून झाला. आरोपींनी महिलेचा मृतदेह पोत्यात घालून जाधववाडी, मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ निर्जनस्थळी फेकून दिला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री नऊ वाजता उघडकीस आली.
खून झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार शंकर रोकडे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ एका कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत निर्जन स्थळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. खून झालेल्या महिलेची ओळख पटू नये म्हणून पिवळ्या रंगाच्या पोत्यात घालून फेकून देण्यात आले. महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.