न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरूवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता संपन्न होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.










