- पालिकेने कंबर कसली; अन्यथा पगार आणि बिलांवर संक्रांत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२५) :- मालमत्ताकर २८ फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याचा आदेश महापालिका आस्थापनावरील, तसेच कंत्राटी, हंगामी, मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेल्या कराचा भरणा करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.
मालमत्ताकर न भरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन काढले जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. कर भरल्याची पावती विभागातील आस्थापना लिपिकाकडे सादर करावी. शहरात मालमत्ता नसल्यास तसे प्रमाणपत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे. मालमत्ताकराचे देयक न भरल्यास कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दिले जाणार नाही.
दरम्यान ठेकेदारांनाही शहरातील त्यांच्या मालमत्तेचा कर भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मालमत्ताकर भरल्याची पावती सादर केल्यानंतरच ठेकेदारांना कामाचे देयक दिले जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी आदेशात नमूद केले आहे.










