न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२५) :- राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने देखील शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या विविध रुग्णालयांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
या दौऱ्यात महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर यांच्यासह संबंधित रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयांतील उपकरणे, बेड्स, फर्निचर व स्वच्छतागृहांची स्थिती यासोबतच ओपीडी सेवांचा दर्जा आणि व्यवस्थापन याची पाहणी केली. सर्व दवाखाने व रुग्णालयात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. स्टोअर रूम व जंक मटेरिअल रूमच्या व्यवस्थापनाची तपासणीचीही सूचना केली.
रुग्णालयांमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. दवाखाने व रुग्णालयातील अंतर्गत कार्यालयीन सुधारणा करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी विभागांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येत आहेत.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…










