- एक्सप्रेस वेवर अवैधरित्या मालाची वाहतुक करणारी दुकडी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२५) :- रक्तचंदनाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे रक्तचंदन लाकडाचे ओंडके मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन जप्त करण्यात आले आहेत. १. राजाराम गंगाराम गायखे (वय ३७ वर्षे रा. काळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) २. हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (वय ४२ वर्षे रा. विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे मुबंई एक्सप्रेस वे वर एका कंटेनरमधून अवैधरित्या मालाची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जुना ऊर्से टोलनाका येथे सापळा रचुन शिताफिने कंटेनर ताब्यात घेतला. कंटेनरमधील मालाबाबत आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. कंटेनरमध्ये ११ टन ४९० किलोग्रॅम वजनाचे ८ कोटी ६१ लाख ७५ हजार किमंतीचे रक्तचंदनाचे लाकडांची ओडके मिळुन आले. त्यावर सदर रक्तचंदनाचे लाकडांची ओडके व ५० लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकुण ९ कोटी ११ लाख ९१ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे माल कोठुन आणला, कोणाकडुन आणला तसेच ते कोणा कडे घेवुन जाणार आहे याबाबत अधिक तपास चालु आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, संदीप डोईफोडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, पोहवा गडदे, पोना गणेश कोकणे, अमर कदम, हर्षद कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार, यांनी केली आहे.
















