- तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १५ मार्च २०२५) :- देहुगाव येथे रविवारी (दि. १६) रोजी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा होत आहे. बीजनिमीत्त मंदीर येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी सांप्रदायातील भाविक, वारकरी, नागरिक हे दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणारे भाविक हे मोठ्या संख्येने आपली वाहने घेवुन कुटूंबासह देहूगाव येथे येत असतात. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होत असते.
त्यामुळे वाहतुक बदल (दि. १५ ते दि १७) दरम्यान नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच देहूगाव परिसरात रहिवाशी वस्ती वाढल्याने पार्किंग व्यवस्थेच्या अभावी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिचवड वाहतूक शाखेमार्फतीने करण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतुक विभाग अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
१) देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथुन देहूगाव कडे येणाऱ्या सर्व वाहनासाठी रस्ता बंद राहील. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)
२) महिंद्रा सर्कलकडुन फिजुत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक/आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः सदर मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल निघोजे मोईफाटा डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
३) तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगाव जाणारे रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने एच. पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
४) देहु कमान १४ टाळकरी कमान बंद करण्यात येत आहे. इंद्रायणी पुल हॉटेल कॉर्नर दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी
५) १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
६) खंडेलवाल चौक ते देहुकमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद.
७) जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडे मळा (जकातनाका) जाणारी वाहतुक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यांत येत असून झेडे मळ्याकडून कंद पाटील चौकाकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था :-
१. आळंदी-तळवडे कडुन येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक येथील श्री चव्हाण यांचे पार्किंग व गायरान पार्किंग देहू येथे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे.
२. गायरान पार्किंग देहू येथे पीएमपीएल बस स्टॉप करण्यात येत आहे.
३. देहू कमान देहूरोउ ते देहूगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्सच्या शेजारील सीओडीच्या जागेत वाहनांचे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे.
४. चाकण-तळेगांव रोडवरील देहृफाटा येथून देहुगांवकडे येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भगिरथी लॉन्स येथे वाहनांकरीता पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच साईराज चौक ते देहूफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या हॉटेल शॉपिंग कॉम्प्लेक्स यांच्या जागेत वाहने पार्क करतील.
















