न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२५) :- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सांगता बीज सोहळा रविवारी (दि. १६) होत आहे.
दरम्यान बीजसोहळ्यानिमित्त देहूमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहूत येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने अनेक कामे करण्यात आली आहेत, तर उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.
नगरपंचायत हद्दीतील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली असून अतिरिक्त ७० पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील महत्वाच्या २८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इतरही रस्ते, सुरक्षा, आरोग्य, पाणी विषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
















