न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- पैशांसाठी पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक केली आहे. कासारवाडी येथील सुखवानी पॅराडाईज येथे हा प्रकार घडला. नामदेव नागुराव शिंदे (वय ३५, रा. मु. पो. तरोडा, नांदेड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
सिंधू शिंदे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. माहेराहून दहा ते पंधरा लाख रुपये आणण्यासाठी पती शिंदे त्रास देत असत. तसेच, तिला उपाशी ठेवून मारहाण केल्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून सिंधूने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. सहायक निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत .